राष्ट्रवादीत स्वकीयांच्या बंडखोरीने डोकेदुखी

0

कोल्हापूर । जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असतांना राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा सर्वाधिक जिल्हापरिषदांवर व बालेकिल्ले असलेल्या ठिकाणी झेंडा लागावा अशी विव रचना केली असतांना त्याच्या गटातील नेत्यांनी व नेत्याच्या मुलांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीच्या चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर याची पुत्री व माजी खासदार निवेदिता माने याचे पुत्र यांनी जिल्हा परिषद निवडणूकसाठी भाजपचाचे सहकारी घटक पक्ष म्हणून निर्णय घेवून राष्ट्रवादीला धक्का दिला. हे होत नाही तोच सातार जिल्हा परिषद व पंचायत समितत्याच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वपक्षाविरूध्द बंडाचा झेडा फडकविला आहे.उदयनराजेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीविरोधात सारे जण असे चित्र उभे राहते का, याकडे जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सातार्‍यात खासदार उदयनराजेंनी आपली ताकद दाखवून दिली.

उदयनराजेंच्या बंडाने राष्ट्रवादी अस्वस्थ
सातारा जिल्ह्यत नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती होणार?
राजकारणात पवार कोठेही असोत पण सातार्‍याची पडक मजबूतच राहिली आहे. तसेच पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांना सर्वाधिक साथ देणारा जिल्हा म्हणजे सातारा. या पाश्वभूमीवर जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसहस्थानिक संस्थांवर अपवाद वगळता राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. मात्र, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या गोतावळयाशी न जमलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीत ‘जनता हाच’ पक्ष आणि मतदारांची भूमिका हाच अजेंडा, अशी भूमिका मांडत स्वपक्षीयांची जिरवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला घरच्या मैदानावर चीतपट करण्याची संधी काँग्रेस व भाजपसारख्या विरोधकांना चालून आली आहे. नगरपालिका निवडणुकीत सातार्‍यात खासदार उदयनराजेंनी आपली ताकद दाखवून दिली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजा विरुद्ध प्रजा या वादात आपली पकड अधिक घट्ट केली होती.नोंदणीकृत होत असलेल्या या आघाडीला तीन आमदारांचा पाठिंबा असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. उदयनराजेंचे हे बंड पवारांसारख्या मोठया राजकीय शक्तीला शह देणारे असल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कसा अबाधित राखतात.

कोरेंची भाजपाबरोबर आघाडी
पन्हाळा जनसुराज्यसाठी भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय विनय कोरे यांनी चर्चा करुन घेतला आहे. असे जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंग जाधव यांनी सांगितले. पन्हाळ्यात किती जागा जनसुराज्यला मिळणार, असे विचारले असता सर्वच जागा मिळाव्यात अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख नेत्यांच्या मुलांचेच आव्हान!
कोल्हापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षनेते शरद पवार यांनी कोल्हापूरवर कायम बारीक लक्ष ठेवले. चंदगडच्या आमदार कुपेकर याच्या कन्या व माजी खासदार माने याचे सुपुत्र याच्या जिल्हा परिषदेचे पार्श्‍वभुमीवर भाजपचाच सहकारी घटक पक्ष निवडणुक लढवयाची असे नंदा बाभुळगावकर व धर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडली. चंदगड तालुक्याचा विकास आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एव्हीएच या अतिघातक प्रदूषणकारी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाला पाठिंबा दिल्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाला सुरुंग, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
गेल्या आठवडयात राष्ट्रवादीच्या शिरोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी पक्षाचे युवा आघाडीचे एक अध्यक्ष भाजपवासी झाले. आणखीही काही प्रमुखांवर भाजपकडून जाळे फेकले गेले आहे. यामुळे भक्कम वाटणार्‍या राष्ट्रवादीला सुरुंग लागला आहे. मुलाखतीवेळी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची मोकळीक राहील असे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका कोणती संभ्रम निर्माण झाला आहे.

सत्तामुक्त करण्याचा निर्धार
जिल्ह्यतून राष्ट्रवादीला सत्तामुक्त करण्याचा निर्धार उदयनराजेंनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते हवालदिल आहेत. उदयनराजेंचा सर्वपक्षीय नेत्यांशी असलेला दोस्ताना पवारांची डोकेदुखी ठरणार आहे.काँग्रेस, भाजपसह विरोधकांची एकजूट साधण्यात उदयनराजे यशस्वी होतात का? यावर बरेच काही अवलंबून असून, आमदार चव्हाण, आमदार गोरे व आमदार देसाई हे तिन्ही दिग्गज लोकप्रतिनिधी कोणत्याही मार्गाने राष्ट्रवादीची पीछेहाट करण्याचेच राजकारण करतील, यात शंका नाही.