मुंबई: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढणारे माजी आमदार धनराज महाले पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले आहे. महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रावाडीला जबर धक्का बसला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केले. त्यांच्यासोबत नाशिकचे माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे पुत्र दिलीप व दिंडोरीतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी देखील होते. महाले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.