राष्ट्रवादीला हादरा; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत

0

बीड: राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बीड जिल्ह्यातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. अखेर आज बुधवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. राष्ट्रवादीमधील गटबाजीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शरद पवारांकडे माझी भूमिका मांडली होती. पण आता बोलण्यासारखे काही उरलेले नाही. आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावे, असे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. इतके वर्ष मी राष्ट्रवादीसाठी काम केले, मात्र पक्षनेतृत्वाने दखल घेतली नसल्याचे आरोप त्यांनी केले.