राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन गटनेता कोण?

0

मंगळवारी कार्यालयात होणार बैठक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन गटनेत्याची निवड करण्यासाठी येत्या मंगळवारी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विरोधी पक्षनेतेपद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुपे यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचनादिल्या आहेत.

या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदार्‍या नको, अशी सूचना पवार यांनी केल्याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीला पवार यांच्यासह खासदार वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेवगायकवाड, कमल ढोले पाटील, बापू पठारे, अंकुश काकडे तसेच शहर राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. गटनेत्याच्या निवडीबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले. या नावांची चर्चा माजी महापौर दत्ता धनकवडे, बाबुराव चांदेरे, अश्‍विनी कदम, वैशाली बनकर, विशाल तांबे, दिलीप बराटे, सुनील टिंगरे यांची नावे गटनेत्याच्या शर्यतीत आहेत. दर वर्षी गटनेता बदलण्यात यावा, अशी पवार यांची सूचना असल्याची चर्चा आहे. गटनेत्याच्या निवडीमध्ये महिलांनाही संधी देण्यात येणार आहे.