राष्ट्रवादी-काँग्रेसने जनतेला दूषित पाणी पाजले

0

बबनराव लोणीकर; बोदवडला 51 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

भुसावळ– राष्ट्रवादी-काँग्रेसने जनतेला दूषित पाणी पाजले आता मात्र भाजपाच्या काळात जनतेला शुद्ध पाणी मिळत असल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बोदवड येथे व्यक्त केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवार, 27 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. लोणीकर म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्जमाफी, बोंडअळीचे पंचनामे आदी शेतकरी हिताचे निर्णय भाजपाने सरकारने घेतले. व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, सभापती गणेश पाटील, निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर जि.प.सदस्य जयपाल बोदडे, बोदवड नगराध्यक्ष मुमताज बी.शेख बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.