बारामती । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मगावच्या काटेवाडी या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला चक्क शिवसेनाची साथ घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमध्ये शिवसेनेस एक जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात हा चर्चेचा विषय रंगला आहे. काटेवाडी गावाचा फार विकास केल्याचा गाजावाजा केला गेला मात्र या विकासावर या युतीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात मोठा आटापिटा करून दोनशे कोटींच्यावर खर्च या गावात केल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात गावच्या अनेक समस्या तशा प्रलंबितच आहेत. त्यामुळे गावात तरुणांनी व महिलांनी विरोधी पॅनल तगड्या स्वरूपात उभे केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विजयासाठी चांगलेच झटावे लागणार आहेत. तरीही राष्ट्रवादीच्या हातून सत्ता जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे.
तीस उमेदवार समोरासमोर
प्रभाग क्र. 1मधून उषा देवकाते, बापू भिसे, लता मासाळ, प्रियांका देवकाते, राजू भिसे, हेमलता जगताप. प्रभाग क्र. 2 मध्ये पांडुरंग बापुराव मारकर, समीर मुलाणी, रुक्मिणी गायकवाड, शितल काटे, युवराज काटे, राहूल काटे. प्रभाग क्र. 3मधून सुनिता नाथा गायकवाड, शितल धनेश भिसे, रंजना लक्ष्मण लोखंडे, दादाराम काळू गायकवाड, नितीन लवा भिसे, दत्तात्रय महादेव दळवी, धीरज घुले. प्रभाग 4 मधून आशा शिवाजी शिंगाडे, स्वाती संतोष लकडे, शितल धनेश भिसे, संजीवनी दत्तात्रय गायकवाड, दिपक हरिश्चंद्र वाघमोडे, ज्ञानदेव लक्ष्मण मासाळ, बाळासाहेब अर्जून वायसे. प्रभाग क्र. 5मधून दयानंद आबासाहेब घुले, श्रीधर घुले, शैला काळे, पद्मिनी पोपट देवकर, विमल दिलीप गडदरे, स्वाती अजित गडदरे, हे असे 30 उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवित आहेत.
राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्याने काटेवाडीतील नोकरदार वर्गाची यादी केली असून इतर शेतकर्यांना आपण काय काय दिले? याचीही यादी केली असून या लाभार्थ्यांना बोलावण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येथे तगडा विरोध झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीत गेल्या दोन वेळा बिनविरोध निवडीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी महिला राजची ढाल उभी करून कशाबशा स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस तगून आली. मात्र यंदाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमध्ये सरपंच पदासाठी विद्याधर काटे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर विरोधकांमध्ये पांडुरंग कचरे यांनी हे लढणार आहेत. याशिवाय मुकेश भिसे, निलेश जाधव, सुनिता गायकवाड हेही रिंगणात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेने सुरूवातीस युती करण्याचे प्रयत्न केले.