हॉटेल व्यावसायीक सारंग पाटलांनी केला सत्कार
भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे शहरातील हॉटेल व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सारंगधर (छोटू) पाटील यांनी शुक्रवारी स्वागत केले. अॅड.पाटील हे बोदवड येथून जळगाव जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल पंजाब खालसाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. हॉटेलचे मूळ मालक स्व.निर्मल सिंग यांचे व अॅड.भैय्यासाहेब पाटील यांच्या वडीलांचे सलोख्याचे संबंध होते व तो जिव्हाळा भैय्यासाहेबांनी कायम ठेवत छोटू पाटील यांच्या सामाजिक कार्याचा प्रसंगी त्यांनी गौरव करीत त्यांच्या कार्याला शुभेच्छाही दिल्या. प्रसंगी कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक अध्यक्ष ललित बागुल, युवक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी उज्ज्वल पाटील, नामदेव पाटील तसेच हॉटेलचे व्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.