राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांवरील हल्ल्याचा भुसावळसह रावेर व यावलमध्ये निषेध

0

भुसावळ– राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश अण्णा पाटील यांच्यावर दुचाकीने आलेल्या अज्ञात युवकांनी हल्ला केल्याच्या प्रकाराचा भुसावळसह यावल व रावेरमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध केला. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी व तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

अण्णा बचावले मात्र आरोपी निसटले
रावेर- पारोळ्याचे आमदार तथा राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्या चारचाकीवर दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेटधारी अज्ञात तरुणांनी दगड भिरकावला. गाडी वेगात असल्यामुळे चालकाबाजूची काच फुटली मात्र चालकाने तोल सांभाळल्याने अपघात टळला. या बाबीचा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध केला आहे. माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह रावेर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, जॉकी दादा साबळे, ओबीसी सेल तालुकाध्य सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनोद चौधरी, विलास ताठे, मेहमूद भाई, महिला तालुकाध्यक्ष माया बारी तसेच सर्व सेलचे तालुकाध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळात हल्ल्याचा निषेध

भुसावळ- राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी अण्णांवरील हल्ल्याचा निषेध करीत दोषींविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दिले. अन्यायाला वाचा फोडणार्‍यांवर अशा प्रकारचे हल्ले सुरूच असतात त्यामुळे दोषींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, वरणगावचे गटनेते राजेंद्र चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विजय अवसरमल, नितीन वराडे, पंचायती समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलीक चौधरी, नीलेश निमसे, धनराज ओगले, प्रवीण वळस्कर, सुभाष पाटील, रवींद्र चौधरी, अशोक चौधरी, राजेश चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

यावलला प्रशासनाला निवेदन
यावल- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीष पाटील यांच्यावर हल्लाचा प्रयत्न पूर्वनियोजीत होता मात्र चालकाच्या अनुभवी चालकाने तो उधळून लावला या घटनेचा येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. दोषीविरूध्द कडक कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, विनोद पाटील, व्दारका पाटील, सुरेखा पारधे, निवृत्ती धांडे, बापु जासुद, राज अशोक कोळी, राजेश करांडे, हितेंद्र गजरे, विकास पाटील, सुकदेवराव बोदडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.