राष्ट्रवादी महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षपदी खराडे

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंरोजगार व महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षपदी कविता खराडे यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. तसेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात निवडीचे पत्र देताना माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पुष्पा शेळके, गंगा धेंडे, मनिषा गटकळ, सुनंदा काटे, आशा शिंदे उपस्थित होते. कविता खराडे पक्षाच्या अनुभवी, कार्यक्षम व अभ्यासू कार्यकर्त्या आहेत. त्यांनी निरिक्षक, उपाध्यक्ष, महिला मुख्य संघटक म्हणून पक्षाची धुरा सांभाळली आहे.