राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी देवकांत पाटील

0

पक्ष वाढीसह केलेल्या उत्कृष्ट कामांची पक्षांकडून दखल
यावल: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुकाध्यक्षपदी विरावली येथील देवकांत बाजीराव पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जळगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.

देवकांत पाटील यांच्या निवडीबद्दल प्रा. मुकेश येवे, अनिल साठे, सिताराम पाटील, दिनू पाटील, विजय पाटील, एम. बी. तडवी, भरत चौधरी, चंद्रकांत येवले, राकेश सोनार, विनाद पाटील, कुलदीप पाटील, राज कोळी यांनी अभिनंदन केले आहे. देवकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासत्तठी आंदोलने, निवेदने, परीक्षा कालावधीतील भारनियमन बंद करणे, शिष्यवृत्ती आदी समस्यांविरोधात आवाज उठविला होता. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन व पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी जागृती करून सतत दोन वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यासह त्यांचे संघटन कौशल्य व पक्ष वाढीसाठी व पक्ष रूजविण्यासाठी केलेल्या कामांची दखल घेत त्यांची वरिष्ठांनी तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली. ही जबाबदारी सांभाळत असताना ग्रामीण भागातील युवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या समस्यांविरोधात आवाज उठविणे, त्या सोडविण्यासाठी धडपड करणे, युवकांचे संघटन वाढविणे, पक्षाने दिलेले आदेशानुसार कार्यक्रम राबविणे, आंदोलन करणे, निवेदने विविध जबाबादार्‍या योग्यपद्धतीने त्यांनी पार पडल्या. कर्जमाफी, पीक विमा, यासह विविध बाबींवर त्यांनी आंदोलनाद्वारे आवाज उठविला.

राजकारणात समाजकारणा प्राधान्य देऊन पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सामान्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी जनजागगृती केली. योजनांचा पाठपुरावा करून सामान्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला. या पार्श्‍वभूमीवर त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आगामी काळात वन बुथ 10 युथ ही संकल्पना गावागावात राबविणार असून गाव तेथे शाखा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देवकांत पाटील यांनी सांगितले आहे.