राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने मानले प्राचार्यांचे आभार

0

चाळीसगाव । शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात पडलेल्या पावसाच्या पाण्याने डबके साचले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत प्राथमिक शाळेत जाणार्‍या लहान बालकांचे हाल होत होते. त्यात अनेकदा लहान मुलं चिखलात पाय घसरुन पडली होते. त्या संदर्भात ये जा करणारे शिक्षक वर्ग बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरात मुरुम, खडीचा भराव करण्यात येऊन विद्यार्थी वर्गाचे होणारे हाल थांबवावेत, या आशयाचे निवेदन चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांना देण्यात आले होते.

आभारपत्र देतांना यांची होती उपस्थिती
त्याची तात्काळ महाविद्यालय प्रशासनाने दखल घेत मुरुम खडी आदींचा भराव करुन घेतला. याबाबत विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानले असून त्या आशयाचे आभार पत्र आज प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांना देण्यात येऊन पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष सर्वेश भोसले, अजगर पाटील, अक्षय देशमुख, कृष्णा चौधरी, पवन देसले, राहुल पाटील, मृदुल देशमुख, चेतन पाटील, कृष्णा बेलदार, प्रितेश आहेर, धनंजय चव्हाण आदी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.