राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकाचे नामकरण

0

इंदापूर । राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 142 व्या जयंतीनिमित्ताने इंदापूर शहर व तालुका परीट समाज संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू स्मशान भूमीसमोरील चौकाला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले. या नामकरण फलकाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील परीट समाजाकरीता धोबी घाटासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. इंदापूर अ‍ॅर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, शांतीलाल कारंडे, मुकुंद शहा, श्याम कदम, सोपान कारंडे, हनुमंत घोडके, नाना पाटोळे याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी राऊत यांनी तर आभार आप्पा राऊत यांनी मानले.