नंदुरबार । छत्तीसगड येथे होणार्या 31 व्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी येथील राहुल गायकवाड याची निवड झाली आहे. त्यानिवडीबद्दल पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी त्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने शिव छत्रपती स्पोर्टस् क्रीडा संकुल बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या 31 व्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा खेळाडू राहुल विजय गायकवाड याने 94 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवून नंदनगरीचे नाव उंचाविले आहे. तसेच या विजयी खेळाडूची निवड छत्तीसगड येथे होणार्या 31 व्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे.
त्यांच्या यशाबद्दल नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी त्याचे कौतुकास्पद अभिनंदन केले. यावेळी नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सोनार, सचिव योगेश माळी, सहसचिव नरेंद्र माळी, उपाध्यक्ष कुंदन माळी, संतोष मराठे, पो.कॉ.विजय गायकवाड आदी उपस्थित होते. राहुल गायकवाड यास प्रशिक्षक गणेश मराठे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.