राष्ट्रीय कृषी विकास योजना मुरघास युनिटसाठी अनुदान

0

जळगाव। राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 22 व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या सभेत राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत ‘बहुवर्षिय वैरण पिकांची लागवड व उत्पादन करुन मुरघास तयार करणे’ या प्रकल्पास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार पशुधनास आवश्यक हिरव्या वैरणीच्या उपलब्घतेमधील कमतरता अनियमित व अपुर्‍या पर्जन्यमानामुळे उद्भवणारी टंचाई परिस्थितीत पशुधनास कमी पोषणमुल्य असलेली वैरण खाऊ घालावी लागते. त्यामुळे पशुधनाच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

हे टाळून पशुधनास चांगले पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्याकरीता शासन निर्णय व खात्याच्या मार्गदर्शक सूंचनातील अटी व शर्ती पंचायत समिती कार्यालयात पाहावयास मिळतील. लाथार्थी यांचे बॅक खाते आधारकार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.