राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन

0

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागातर्फे शनिवारी 24 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन पत्रकार भवन येथे तहसिलदार अमोल निमक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. ग्राहक संरक्षण चळवळीचे मान्यवर सदस्य राजस कोतवाल, अ‍ॅड. मंजुळा मुदंडा, संगीता अट्रावलकर यांनी सर्व सामान्य जनता तथा ग्राहक यांनी वस्तू खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, खरेदीनंतर झालेल्या फसवणूकीस न्याय मिळावा यासाठी ग्राहक न्यायालयाचे अधिकारांविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात तहसिलदार श्री. निकम यांनी ग्राहक संरक्षण समितीचे मान्यवर सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचा योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हा दूध विकास फेडरेशनचे सुपरवायझर बाळासाहेब पाटील, वजन मापे निरीक्षक सी.डी. पालीवाल, भारत गॅसचे दिलीप चौबे, हर्षल गॅस एजन्सीचे, श्री.देसाई, अन्न व औषधे प्रशासक अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, तालुका कृषि अधिकारी डी. वाय. महाले, पं.स. कृषि अधिकारी एम.जी.पाटील, इंडियन गॅस प्रतिनिधी प्रतिभा नेमाडे, ग्रामपंचायत सचिव संतोष टेंभुर्णीकर, जळगाव तालुका पुरवठा तपासणी अधिकारी दिपक कुसकर, श्री. नन्नवरे, श्री. जाधव आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमनादास भाटिया यांनी केले.