पुणे । भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने पाच तर संजिती सहा व वेदिका अमिन यांनी चार सुवर्णपदके पटकावले. महाराष्ट्र संघाने 247 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
उत्कर्षची लक्षवेधी कामगिरी
200 मी. मिडले प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने 2.42.91सेकंद वेळ नोंदवत शॉन गांगुलीचा 2015सालचा 2.43.13 सेकंद वेळेचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. याआधी उत्कर्षने लक्षवेधी कामगिरी करत 50मी बॅकस्ट्रोक प्रकारात 34.30 सेकंद वेळ नोंदवून याआधीचा आपलाच 34.88 चा विक्रम मोडीत काढत एक नवा विक्रम नोंदवला.
संजिती सहाचा विक्रम
याशिवाय उत्कर्षने 50 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. फ्रीस्टाइल, 100मी. फ्रीस्टाइल, 50मी. बटरफ्लाय या प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून हार्मनी क्लब येथे प्रशिक्षक नरेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 50 मी. बटरफ्लायमध्ये मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या संजिती सहाने 30.17 सेकंदांचा विक्रम नोंदवला.