राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

0

मुंबई । तायक्वॉदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वॉदो असोसिएशन ऑफ छत्तीसगढ़ आयोजित 37 वी राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वॉदो स्पर्धा व 10 वी राष्ट्रीय पुमसे तायक्वांदो स्पर्धा 28 ते 31 डिसेंम्बर दरम्यान छत्तीसगड येते संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही संघ नुकतेच मुंबई येथे जाहीर करण्यात आले. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्याची निवड या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून 6 ते 7 वर्षानंतर तायक्वांदो मधील वाद विवाद बाजूला ठेवत खेळासाठी सर्वजण एकत्र येऊन संघ निवड केली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू कशी कामगिरी करतात ते पाहावे लागेल. या सर्व खेळाडुंना राष्ट्रीय तायक्वॉदो प्रशिक्षक सुरेश चौधरी (सांगली),तुषार आवटी (पुणे ), प्रसाद कुलकर्णी (औरंगाबाद), पद्माकर कांबळे (कोल्हापूर) राजा मखवाना (पालघर), रोहित जाधव (ठाणे), प्रशांत गजभिये (नाशिक) या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे
मुले : 1.रिशी भलेकर (मुंबई), 2.कौस्तुभ कसबे (पुणे), 3.चंद्रकांत लोहार (सांगली), 4.अनिकेत कुचिकोरवी (सांगली), 5.निखील सातपुते (सांगली), 6.चंचल शर्मा (मुंबई उपनगर),7.सुजोग जगताप (ठाणे), 8.रितेश अगवाने (मुंबई उपनगर), 9.साहील घुगे (ठाणे),10.सौरभ जाधव (कोल्हापूर)

मुली : 1.रोहीणी फड (अकोला),2.अंजली तायडे (अकोला), 3.मनिषा जाधव (सांगली), 4.पुनम खाशिद (अकोला), 5.जान्हवी फिरमे ( सातारा), 6.मधु सिंग (मुंबई), 7.पुजा कांबळे (सांगली), 8.शिवाणी चव्हाण (सांगली), 9.रुपाली काळोखे (सांगली), 10.मेघा खरात (मुंबई उपनगर),

पुमसे तायक्वॉदो संघ : आकाश पानचाळ, सूची सरोज, यश गुरुव, प्राजक्ता बदगिरे, साहील पाटील, शुभम यादव, हार्दिक शेट, प्राजक्ता बदगिरे, निधी तानसे.