राष्ट्रीय दलित पँथरतर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने

0

भुसावळ। येथील राष्ट्रीय दलित पँथरतर्फे आपल्या विविध मागण्यांसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय साळवे, राजू तायडे, मयुर सुरवाडे, गणेश जाधव, रितेश नाईक, सागर कुरेशी, स्वप्निल देशमुख, अनिल इंगळे उपस्थित होते.

पँथरतर्फे करण्यात आलेल्या मागण्या
निवेदनात नमूद मागण्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोयाडी गावातील चर्मकार समाजातील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दलितांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, आव्हाणे गावातील जातीय दंगलीची चौकशी करण्यात यावी, मुद्रा योजनेतील गरजू कर्जदारांना योजनेचा लाभ मिळावा, शहरामधील अनधिकृत शिकवण्या बंद करण्यात येवून शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.