नंदुरबार। निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण व राज्य अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवाडा 27 जून, 2017 ते 11 जुलै, 2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस -एनपीएस योजनेचे सभासद यांच्यासाठी या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी एका शासकीय प्रसिध्दी कळविले आहे.या कालावधीत कार्यालयीन वेळेत पुढील मुद्दयांचे/ अडचणींचे निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सर्व सभासदांची वैयक्तिक माहिती एस-2 फॉर्मच्या आधारे अदयावत करणे, सर्व सभासदांचे नामनिर्देशन घेण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री करणे,नसल्यास संबंधित सभासदांकडून त्यांचे नामनिर्देशन प्राप्त करून घेण्यात यावे, यासोबत इतर बाबी लक्षात घ्यावात, असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.