The driver was killed on the spot after a speeding truck hit a divider in Bhusawal भुसावळ : भरधाव ट्रक डिव्हायडरवर धडकून झालेल्या अपघातात परप्रांतीय चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वतःच्या मृत्यूस व ट्रकच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकला ट्रक
भरधाव ट्रक (एच.आर.56 बी.5864) हा भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटल्याने साकेगाव शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळील मोरया अॅटो शोरूमसमोरील रोडवर धडकल्याने ट्रकमधील चालकाचा (नाव, गाव माहित नाही) मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी हॉटेल चालक माधवराव नामदेव मराठे (70, साकेगाव) यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.