राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर जवळ ट्रक कार भीषण अपघात

राजस्थान मधील सासू सूनचा मृत्यू तर ४ गंभीर जखमी

शिरपूर- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघात झाल्याची घटना तालुक्यातील पळासनेर जवळ पहाटेच्या सुमारास घडली असून या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.या अपघातात मीनादेवी राहुलराव रावभाट वय ३० रा.किसनगड जिल्हा अजमेर असे जागीच मयत महिलेचे नाव असून बडवणी येथे उपचारादरम्यान ५५ वर्षी  महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून दोघी मयत महिला नात्यांनी सासू सुना आहेत. 
        हा अपघात तालुक्यातील पळासनेर शिवारात भिलट बाबा मंदिरासमोर शिरपूर कडून इंदुरकडे जाणाऱ्या आर जे ०७ जीए ९४१७  ट्रक व  कार क्रं आर जे ४२ सीए ३८६४ यांच्यात भीषण अपघात झाला असून अपघातात घटनास्थळी मीनादेवी राहुलराव रावभाट मयत झाल्याने त्यांना महामार्ग अम्ब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.तर जखमींना सेंधवा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण आहे या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.दोन्ही वाहने शिरपूर कडून इंदोर कडे जात असतांना भरधाव वेगातील कारने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात चालकाचे त्याच्यासह दोन मुले,वडील गंभीर जखमी झाले असून आई व पत्नी मयत झाले आहेत हे सर्व राजस्थान मधील अजमेर जिल्ह्यातील किसनगड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आली आहे.
        प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ मांडगे करीत आहेत.