रावेर : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या 63 व्या राष्ट्रीय शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेत सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीचा खेळाडू गोविंदा सुनील महाजनने 56 किलो वजन गटात 197 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले. व्ही.एस.नाईक महाविद्यालय जिमखान्यावर वेट लिफ्टिंग प्रशिक्षक अजय महाजन व लखन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव केला.