भारत विकास परीषदेच्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत भुसावळातील 16 शाळांचा सहभाग
भुसावळ- भारत विकास परीषदेच्या भुसावळ शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत सेंट अलॉयसीस हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या स्पर्धेत शहरातील 16 शाळांमधील 180 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा प्रमुख रमाकांत भालेराव यांनी स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
जवाहर विद्यालय द्वितीय तर महाराणा प्रताप विद्यालय तृतीय
विविध वेशभूषा केलेल्या प्रत्येक शाळेच्या सहभागी गटाला राष्ट्रपुरुषांची नावे देण्यात आली होती. पुर्ण तयारीत आलेल्या स्पर्धकांनी अत्यंत जोशात ताल, सुर व लय सांभाळत देशभक्तीपर गीते सादर केली. यात प्रथम -सेंट आलायसेस, (दोन हजार पाचशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), द्वितीय- जवाहर नवोदय विद्यालय , (एक हजार पाचशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) ,तृतिय- महाराणा प्रताप विद्यालय, ( सातशे पन्नास रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) अशी पारीतोषीके आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रशांत फौंडेशनचे प्रशांत महाशब्दे, कुकरेजा व पिंच सॉफ्टड्रिंकचे शेख यांच्या हस्ते देण्यात आली. यातील प्रथम क्रमांक पटकावलेल्या शाळेला 30 सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणार्या प्रांत स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जळगाव येथील संगीत शिक्षक गिरीश मोघे, रेवती ठिपसे, प्रांजली रस्से यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
संस्कारक्षम वयातच देशभक्तीची भावना रूजवणे गरजेचे -आमदार सावकारे
आमदार सावकारे म्हणाले की संस्कारक्षम वयातच देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून चांगले संस्कार होतात. भारत विकास परिषदेचे देशभक्त पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, चांगल्या कार्यक्रमासाठी पालिकेतर्फे यापुढे सहकार्य केले जाईल. भुसावळ शाखेच्या अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते यांनी भारत विकास परीषदेच्या देशभरातील विविध ठिकाणी चाललेल्या महत्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन राधा चव्हाण व आभार सचिव उज्वल सराफ यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
स्पर्धा यशस्वितेसाठी परीषदेच्या अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते, स्पर्धा प्रमुख रमाकांत भालेराव, सहप्रमुख राधा चव्हाण , जिल्हा संयोजक योगेश मांडे, श्याम दरगड, डॉ.मनिषा दावलभक्त, विलास फालक, सुनील इंगळे, शंभू मेहेंदळे, गौरव हिंगवे, बालकीसन पासी, गोटू लाहोटी, भूषण वाणी, विजय जोशी, कपिल मेहता, डॉ अर्चना खानापूरकर, विशाल अग्रवाल, सुचिता मांडे, विधी मेहता, पल्लवी इंगळे, स्मिता वाणी, विशाखा विभूते व आनंद फडके आदींनी परीश्रम घेतले.