नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट आता राहुल गांधी आणि सीपीएम महासचिव सीताराम येचुरी तसेच अन्य नेत्यांना एका कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. यापूर्वी आरएसएसने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नागपूर येथे एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, संघाने दिल्लीत होणाऱ्या ‘भविष्य का भारत’: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टीकोन या कार्यक्रमात राहुल गांधी आणि अन्य विरोधी नेत्यांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम १७ ते १९ सप्टेंबर पर्यंत होणार आहे.