राससोनी चे पदाधिकारी सीआयडीसोबत इस्लामपूरला

0

जळगाव । बीएचआर पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांना आज सीआयडी पथकाने जळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेऊन त्यांची सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर हे पथक आरोपींसह इस्लामपुरला रवाना झाले.

इस्लामपूर येथे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या संचालकांविरुध्द गुन्हा दाखल असल्याने चौकशीसाठी सीआयडीच्या 5 जणांच्या पथकाने जिल्हाकारागृहातून त्यांना ताब्यात घेतले. प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडीया, मोतीलाल जीरी, सुरजमल जैन, दादा पाटील, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉ.हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवाणी, शेख रमजान , यशवंत जिरी, लताबाई सोनवणे या पदाधिकार्‍यांना सीआयडी पथकाने ताब्यात घेतले आहे.