राहुल गांधींनी गुजरात निवडणुकीत घेतलेली मेहनत पाहता ते अध्यक्ष म्हणून यशस्वी होतील याविषयी शंकाच नाही. राहुल यांच्या निवडीला देशभरातून एकमुखी पाठिंबा मिळत आहे. यामुळे अर्थात राज्यातील निष्ठावंत मंडळींना महत्त्व आले आहे. तरुणांची फळी उभारली त्याप्रमाणे आता 4-5 जुने चेहरे सोडले, तर पक्षातील तरुण आमदारांच्या कामगिरीकडे राहुल गांधींचे लक्ष आहे. राज्यातील काँग्रेसची ताकद निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. दिवसेंदिवस भाजपची लोकप्रियता घसरत आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये एक वेगळेच चैतन्य पसरले आहे.
राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. कितीही लाटा आल्या, तरी गांधी घराण्याचे महत्त्व कमी होत नाही. हे या निवडीने सिद्ध झाले आहे. राहुल गांधींनी गुजरात निवडणुकीत घेतलेली मेहनत पाहता ते अध्यक्ष म्हणून यशस्वी होतील याविषयी शंकाच नाही. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी स्टार प्रचारक होते. त्यांनी एकहाती या निवडणुकांचा प्रचार केला होता. पण उत्तर प्रदेशातील अपयशाने ते खचले नाहीत. गुजरातच्या प्रचाराची धुरा त्यांनी न डगमगता स्वतःच्या खांद्यावर घेतली. या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच त्यांची काँग्रेस अध्यक्षपदावर निवड होत आहे. सोनिया गांधी यांनी तब्बल 18 वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर त्या राहुल गांधी यांच्याकडे ही धुरा सोपवत आहेत. राहुल यांच्या निवडीला देशभरातून एकमुखी पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातूनही त्यांना एकमुखी पाठिंबा मिळाला आहे. यामुळे अर्थात राज्यातील निष्ठावंत मंडळींना महत्त्व आले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांविरोधात छुपी लढाई लढत असतानाच त्यांचे महत्त्व वाढणार आहे. पण अशोक चव्हाण हे राहुल यांच्या गळ्यातील ताईत आहेत. खासदार राजीव सातव, आमदार यशोमती ठाकूर हे थेट राहुल गांधींचे उमेदवार आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते असले, तरी त्यांचे विरोधक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे थेट राहुल गांधींच्या संपर्कात असतात. बाळासाहेब थोरात यांचे महत्त्व वाढवण्यास शरद पवार हे कारणीभूत आहेत.हे सांगून कुणास खरे वाटणार नाही. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात सहकारी साखर कारखान्याची चळवळ सुरू करायची होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार हे दुसर्या पक्षाचे असताना त्यांनी त्यांच्याशी सल्लामसलत केली. पवार राहुलना त्यावेळी पुण्याच्या वसंतदादा शुगर खपीींर्ळीीींंश मध्ये घेऊन गेले. त्यावेळी पवारांनी बाळासाहेब थोरातांचे नाव राहुलना सुचवले. तुमच्या पक्षाचे एक आमदार बाळासाहेब थोरात हे प्रामाणिकपणे सहकारी कारखाना चालवतात आणि शेतकर्यांना उसाचा भावही सर्वाधिक देतात. हे पवारांनी राहुलना सांगितले. त्यावेळी व्हीएसआयमध्ये राहुल, पवार आणि थोरात हे तिघेच होते. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी तेथे आले. त्यांनाही राहुलनी परत पाठवले, तेव्हापासून बाळासाहेबांचे राहुल दरबारी वजन वाढले.राहुल यांच्या शिफारसीनुसार बाळासाहेबांना महसूल मंत्रिपद मिळाले होते. आता गुजरात निवडणुकांची जबाबदारी राहुल यांच्या सूचनेनुसार बाळासाहेबांना मिळाली. पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक असल्याने अशोक चव्हाण बाळासाहेबांच्या महत्त्वाच्या पदासाठी विचार करत नाहीत. पण गुजरात निवडणुकीनिमित्ताने त्यांचे महत्त्व वाढले आहे. राहुल गांधींशी थेट संपर्क असल्याने आता त्यांचे वजन अर्थातच वाढले आहे.
यापुढे राज्यातील तरुण आमदारांचे वजन वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळीच भाकरी परतवली आणि तरुणांची फळी उभारली त्याप्रमाणे आता 4-5 जुने चेहरे सोडले, तर पक्षातील तरुण आमदारांच्या कामगिरीकडे राहुल गांधींचे लक्ष आहे. अमीन पटेल, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, प्रणिती शिंदे आदी तरुण आमदारांवर राहुल यांचे विशेष लक्ष आहे.राज्यातील काँग्रेसची ताकद निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. शरद पवारांनाही आता काँग्रेसशी संघर्ष करण्यात रस नाही. त्यामुळे राहुल यांच्याशी जमवून घेण्याशिवाय पर्याय नाही.दिवसेंदिवस भाजपची लोकप्रियता घसरत आहे. याचा फायदा संयुक्तपणे घ्यावा, या अनुमानावर शरद पवार आले आहेत. पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, हे त्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना राजकारणात योग्य ठिकाणी सेटल करणे, हे एकमेव ध्येय त्यांच्यालेखी उरले आहे. बाकी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय कुरघोड्या करणे क्रमप्राप्त आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.मात्र, राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये एक वेगळे चैतन्य पसरले आहे. सर्व गट- तट यानिमित्ताने कधी नव्हे, ते एकत्र आले आहेत. राहुल गांधीच काँग्रेसला अच्छे दिन आणतील, या अपेक्षेने हे एकत्र आले आहेत.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124