राहुल गांधींनी मोदी सरकारला घेतले फैलावर

0

भोपाळ : पंतप्रधान मोदींवर निशाणा सादताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणले ‘अच्छे दिन आऐंगे’ हा नारा बदलून आता ‘चौकीदारच चोर आहे’ असा नारा द्यावा लागेल. ते मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान खारगाव येथे एका जनसभेला संबोधित करताना राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारला फैलावर घेतले.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीला आता कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावर चांगलेच तापले आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खारगाव येथे जनसभा होती. मागच्या निवडणुकांमधील भाजप सरकारच्या ‘अच्छे दिन आऐेंगे’ या नाऱ्यावरुन त्यांनी भाजपसह मोदींवर टीकेची झोड उचलली होती.

मागच्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ चा नारा दिला होता. मोदींच्या सभेमध्ये मोदी अच्चे दिन म्हणायचे. त्यावर जनता ‘आऐंगे’ म्हणून उत्तर द्यायची. कालांतराने हा नारा बदलला. त्यानंतर ‘सुट बूट की सरकार’ हा नारा झाला. मात्र तो ही जास्त काळ टिकला नाही. आता तर चक्क ‘सुट बूट झूठ आणि लूट की सरकार’ असाच नारा झाला आहे, या शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींच्या अच्छे दिने आऐंगे या नाऱ्याचा समाचार घेतला.