नवी दिल्ली-लोकसभेत शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशाने बघितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. देशभरात राहुल गांधींची ही गळाभेट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. गळाभेटीनंतर लगेचच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते अमूलच्या कार्टूनने. आपल्या हटके कार्टून्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूनले या गळाभेटीवरील कार्टून प्रसिद्ध केले असून लोकांना ते प्रचंड आवडत आहे.
देशभरात घडणाऱ्या विविध घटना घडमोडीवर अमूल आपल्या हटके कार्टूनद्वारे सगळ्याचे लक्ष वेधून घेत असतो. काल संसदेत घडलेल्या घटनेचा देखील अमूलने आपल्या कार्टूनद्वारे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर टीका करत त्यांना लक्ष्य करत होते. आपले भाषण संपताच राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेद्र मोदींच्या दिशेने चालत गेले आणि त्यांची गळाभेट घेतली. यानंतर आपल्या जागी येत हिंदू असण्याचा हा खरा अर्थ आहे असं म्हटलं. आपल्या जागी बसल्यानंतर राहुल गांधी डोळा मारतानाही दिसले, ज्यावरुन अध्यक्ष सुमित्रा महाजन त्यांना हे वागणे योग्य नसल्याचे लक्षात आणून दिले.