अमरावती: आंध्र प्रदेशातील अमरावतीमध्ये आयोजित एका सभेत ‘पंतप्रधान एक असे चौकीदार आहेत, जे दरवाजा उघडतात आणि चोरांना आत येऊ देतात’ अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
मोदी जर खरच चौकीदार असते, तर त्यांनी पळपुट्या विजय मल्ल्याला विदेशात जाण्याची परवानगी देणारे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पदावरुन हटवले असते. मोदींनी जेटलींना पदावरुन हटवले नाही, कारण ते स्वत: भ्रष्ट आहेत, असेही राहुल म्हणाले. जेट विमानांची निर्धारित किंमत ५२६ कोटींवरुन १ हजार ६०० कोटी कशी झाली? तीन पट जास्त किंमत मोजून सरकारने अंबानींच्या कंपनीकडून राफेल विमानाचा खरेदी करार केला. सरकारने एका अशा कंपनीसोबत करार केला, ज्यांनी कधीच विमान बनवले नाही, अशी टीका राहुल यांनी सरकारवर केली.