भोपाळ-मध्यप्रदेशात निवडणुकीची धूमधाम सुरु आहे. दरम्यान आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवशीय मध्यप्रदेश दौऱ्यावर आहे. राहुल गांधी आज उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा करणार आहे. त्यानंतर दौऱ्याला सुरुवात करणार आहे. सकाळी ११.३० ते १२ या वेळेत ते भगवान महाकाल यांची पूजा करणार आहे. आज राहुल गांधी उज्जैनमधील दशहरा मैदानावरील आमसभेला संबोधित करणार आहे.
संध्याकाळी ५.४५ वाजता रोड शो करणार आहे.