राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा

0

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता भाजपने  टीका केली आहे.राहुल गांधी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी त्यांनी  माजी मंत्र्यांच्या ट्विटचा संदर्भ दिला.
पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी राहुल गांधींच्या ट्विटचा वापर केल्याचं संबित पात्रा म्हणाले. ‘राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करणाऱ्या ट्विटचा आधार घेत आधी पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विट केलं. त्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. मोदी राहुल गांधींना घाबरले आहेत. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील, असं पाकिस्तानचे माजी गृहमंत्री म्हणतात. त्यामुळे राहुल गांधींसाठी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात आहे, हे स्पष्ट होतं, असं संबित पात्रा म्हणाले.