नवी दिल्ली: राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
राफेल करारावरील आरोप म्हणजे बालवाडी किंवा प्राथमिक शाळेतील पोरखेळ असल्याची टीका करत जेटलींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.प्रदीर्घ उपचारानंतर कामावर रुजू झालेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राफेल करारावरुन काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.