कोझिकोड: केरळच्या लोकांनी राहुल गांधी यांना निवडून देत मोठी चूक केली असल्याचे मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. र्राहूल गांधी यांना का निवडून दिले? त्यांना संसदेत का पाठवले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. रामचंद्र गुहा यांनी केरळ मधील कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात गुहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
‘व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्या यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?, राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे’ असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नसल्याचं देखील गुहा यांनी सांगितलं आहे.
रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिश्रमाने त्यांची प्रतिमा तयार केली आहे. मोदींनी 15 वर्षे राज्य चालवलं आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. ते प्रचंड कष्टाळू आहेत. युरोपात जाऊनही ते कधीच सुट्टी घालवत नाही असा टोला देखील राहुल गांधींना लगावला आहे. 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसं केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी नाहीत हाच त्यांचा फायदा आहे. केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे.