राहुल गांधींनी खोटे बोलण्याची परंपरा कायम ठेवली-स्मृती इराणी

0

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आता आपण कुणाशी काय बोललो याचा भास होऊ लागले आहेत अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतल्याचे पाहून बरे वाटले. पक्ष आणि राजकीय मतभेद दूर ठेवून त्यांनी ही भेट घेतली होती. मात्र त्यावरून ते राजकारण करतील असे वाटले नव्हते. मात्र पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राफेल करारावरून जे वक्तव्य केले त्यावरून राहुल गांधींनी खोटे बोलण्याची परंपरा कायम ठेवली आहे  अशी टीका इराणी यांनी केली आहे.

राफेल प्रकरणात तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत निष्ठा दाखवावी लागते आहे. तुमच्यावर खूप दबाव आहे हे मी समजू शकतो. नव्या राफेल डीलशी संबंध नाही, नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींला फायदा मिळवून देण्यासाठी हा खेळ केला असे पर्रिकर आपल्याला म्हणाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यांना आता स्मृती इराणींनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी खोटारडे आहेत, खोटं बोलण्याची काँग्रेसी परंपरा पाळत त्यांनी राफेल करारावरून आभासी संभाषण निर्माण केले अशी खोचक टीका स्मृती इराणी यांनी केली.