नवी दिल्ली । काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजकीय कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसाठी जास्त प्रसिद्ध होताना दिसतात. यावेळेस त्यांनी उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास सुरू केला आहे. खरंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी हे सर्व करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या मी गीता आणि उपनिषद वाचतोय कारण आरएसएस आणि भाजपशी लढू शकेन. पार्टीच्या सूत्रानुसार, राहूल यांनी आरएसएसच्या सांगितले की सर्व मनुष्य समान असतात. मग तुम्ही इतरांवर अत्याचार करत आहात. याचा अर्थ असा होतो की आपल्या धर्मातील त्तत्त्वांचा गैरवापर करत आहात. भाजपला खरा भारत कधी कळालाच नाही, त्यांना समजूनही घ्यायचा नाहीए. त्यांना फक्त नागपूरचे आरएसएसचे मुख्यालय कळते तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टार्गेट केले. राहुल म्हणाले आरएसएस समजते की जगातले सर्व ज्ञान पंतप्रधानांपासूनच मिळते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर संपूर्ण देशावर एकच विचारधारा पसरवण्याचा आरोप केला आहे. कोणताही व्यक्ती असो, तो तामीळनाडूत किंवा उत्तर प्रदेशात राहणारा असो, जर त्रास होत असेल तर त्याला विरोध दर्शविण्याचा अधिकार आहे.
तामीळ फिल्म बघणार
संपूर्ण देशावर एकच विचारधारा पसरवण्याची आरएसएसची खेळी आम्ही चालू देणार नाही. त्याचसोबत तामीळनाडूच्या लोकांना त्यांची भाषा, संस्कृती आणि खाण्यापिण्याची राहूल यांनी यावेळी स्तुती केली. देशाच्या इतर राज्यांप्रमाणे ही तामीळनाडूची खासियत असल्याचे ते म्हणाले. तामीळनाडूची संस्कृती समजण्यासाठी त्यांनी तामीळ फिल्म बघण्याचा निर्णय घेतला आहे.