राहुल पाटील जळगावचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

0

जळगाव – वामनराव कदम यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या जळगाव निवासी उपजिल्हाधिकारी पदी नाशिक मनपाचे उपायुक्त राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची बोरीवली मुद्रांक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. असे असले तरी सरकार बदलल्यानंतर प्रशासनातही खांदेपालट सुरूच आहे. जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम यांना औरंगाबाद पुरवठा विभागाच्या उपायुक्तपदी पदोन्नती मिळाल्याने हे पद रिक्त होते. त्यांच्या रिक्त जागी कोण येणार? याविषयीची उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यांच्या रिक्त जागी आता नाशिक महापालिकेचे उपायुक्त असलेले राहुल पाटील यांची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पदाचा पदभार ते आज सायंकाळी घेणार आहेत. तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले राहुल मुंडके यांची देखिल मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.