पुणे । अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा चित्रकर्मी पुरस्कार अभिनेता राहूल सोलापूरकर आणि दिग्दर्शक कांचन नाईक यांना जाहीर झाला आहे. विविध विभागात 17 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष मेहराज राजे भोसले यांनी गुरुवारी दिली.
हा सोहळा 24 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार, तेजस्विनी लोणारी, सुरेथा कुडची, वैशाली जाधव, शर्वरी जमेनीस, श्वेता शिंदे विविध नृत्याविष्कार सादर करणार आहेत. सुभाष परदेशी, श्रीनिवास भणगे, चारुदत्त दुखंडे, प्रभाकर जोग, शाम भूतकर, विक्रिम गायकवाड, ललिता देसाई, नंदकिशोर कपोते, गिरीष ओक, अरविंद चाफळकर व प्रकाश चाफळकर, शेखर सोमण, यशवंत भुवड, अरुणा अंतरकर, दत्ता भणगे, राम पायगुडे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, 10 हजार रुपये व एक पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच पुरस्कारार्थींच्या पत्नींना पैठणी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. संचालिका निकिता मोघे, माधव अभ्यंकर, संजय ठुबे, गिरीश कोळपकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.