एरंडोल । तालुक्यातील रिंगणगाव येथील भोई समाजातील मतीमंद तरुणीवर अत्याचार करणार्या नराधमाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोईराज मित्र मंडळाच्या वतीने तहसिलदार सुनीता जर्हाड यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. भोईराज मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, रिंगणगाव येथील तेवीस वर्षीय मतीमंद तरुणीवर गावातीलच सत्तावीस वर्षीय तरुणाने अत्याचार केले आहेत तसेच अत्याचार करणार्या संशयिताकडून पिडीतग्रस्त तरुणीस जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्याचार करणार्या संशयिताचे समाजबांधव व निकटवर्तीय पिडीत तरुणीच्या मेव्हण्यांवर दबाव टाकुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व समाजाला काळीमा फासणार्या या घटनेचा मंडळाच्या वतीने निषेध करण्यात येत असुन सदरचा खटला अतिशीघ्र न्यायालयात वर्ग करून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भोईराज मित्र मंडळाच्या वतीने तहसिलदार सुनिता जर्हाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, मजदुर संघाचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, नगरसेवक कृणाल महाजन, पांडुरंग भोई, मिलिंद भोई, किरण भोई, विजय भोई, राहुल भोई, राजेंद्र भोई, विश्वास भोई, गणेश भोई, दिपक भोई, महावीर भोई, भिकन भोई, हेमंत भोई, शुभम भोई, राजेश भोई, अमोल भोई, नितीन भोई, ज्ञानेश्वर भोई, स्वप्नील भोई, रामदास भोई यांचेसह समाज बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.