जळगाव। जिल्ह्यातील शाळेतील अथवा संस्थेतील शिक्षकांच्या रिक्त किंवा अतिरिक्त पदासंदर्भात आढावा घेण्यासाठी शनिवारी 15 रोजी शहरातील ए.टी.झांबरे विद्यालयात मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील रिक्त तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या पदासंदर्भात मुख्याध्यापकांकडू माहिती जाणुन घेण्यात आली. जिल्ह्यातील रिक्त अतिरिक्त पदे असलेल्या शाळा, संस्थेचे मुख्याध्यापक यावेळी हजर होते. पदासंदर्भात कार्यवाहीचे वेळापत्रक मुख्याध्यापकांना देण्यात आले असून 20 एप्रिल पर्यत अहवाल शिक्षणाधिकारी यांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती..
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. सदरील कार्यशाळा ही दोन सत्रात होणार आहे. माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, धरणगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा 10 ते 1 वाजे दरम्यान तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, एरंडोल तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा दुपारी 2 ते 5 वाजे दरम्यान घेण्यात आली.