रिक्त अतिरिक्त शिक्षकांसदर्भात शनिवारी कार्यशाळाचे आयोजन

0

जळगाव । जिल्ह्यातील शाळेतील अथवा संस्थेतील रिक्त किंवा अतिरिक्त शिक्षकांच्या पदासंदर्भात शनिवारी 15 रोजी मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदरील कार्यशाळा ही दोन सत्रात होणार आहे. जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, धरणगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा 10 ते 1 वाजे दरम्यान होणार आहे तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, एरंडोल तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा दुपारी 2 ते 5 वाजे दरम्यान होणार आहे. कार्यशाळा ए.टी.झांबरे विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. 2016-17 च्या संच मान्यतेनुसार शाळा अथवा संस्थेतील अतिरिक्त, रिक्त पदे ठरविण्यात येणार आहे. शाळेची संच मान्यता, संस्थेचे अद्यावत, बिंदु नामावली, 1 जानेवारी 2017 पासूनची सेवा ज्येष्ठता यादी आदी अनुषंगीक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ महाजन यांनी केले आहे.