रिक्षाप्रवाश्यांच्या तक्रारी वाढल्या; खा.शिरोळेंनी घातले लक्ष

0

पुणे । भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे अशा रिक्षावाल्यांबद्दलच्या तक्रारी वाढल्या असून वाहतूक पोलीस, आरटीओची यंत्रणा या प्रकारांना अटकाव करण्यात कुचकामी ठरल्या असल्याचा नागरिकांचा तरी अनुभव आहे.
पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर एसटी स्थानक येथे तर रिक्षाचालकांची दादागिरी असते. परगावावरून आलेल्या प्रवाशांना नाडणे, जवळचे भाडे नाकारणे असे प्रकार सर्रास होत असतात. तेथील वाहतूक पोलीस, चौकीतील पोलीस यांचे आणि ठराविक रिक्षाचालक यांचे संधान असते. त्यामुळे प्रवाशांना सहजपणे लुटले जाते, शिवाय तक्रार दाखलच करून घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. रितसरपणे येथे व्यवसाय करू पाहणार्‍या रिक्षाचालकाला येथे पोलिसांमार्फत त्रास दिला जातो, अशा तक्रारी ऐकायला मिळाल्या.