जळगाव- कुसुंबाकडून शहराकडे येत असलेल्या प्रवाशी रिक्षाला समोरून मालवाहतुक चारचाकीने वाहनाने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा रस्त्यावरील जळगाव नाक्याजवळ घडली़ यात रिक्षाचालक इरफान अकबर पठाण यांच्यासह दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरूण परिसरातील मन्यारवाड्यात वास्तव्यास असलले रहिवासी इरफान पठाण हे रिक्षाचालक आहेत. शुक्रवारी सकाळी ते प्रवासी घेऊन कुसुंबाकडून जळगाव शहराकडे येत होते. जळगाव नाक्याजवळून जात असताना त्यांच्या रिक्षाला समोरून येणाऱ्या (एमएच १९ सीवाय २१४९) क्रमांच्या मालवाहतुक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. मालवाहतुक चारचाकी वाहन चालकाने इरफान यांच्या रिक्षाला धडक दिल्यानंतर काही अंतरावर आणखी एका रिक्षाला धडक दिली़ त्यानंतर नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले़