मुंबई: लेनदेनक्लब ही वेतनधारक कर्जदारांना पीअर-टू-पीअर कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे, या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)कडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन (सीओआर) प्राप्त झाले आहे, यामुळे ही कंपनी आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) या मान्यतेने तिला पी२पी व्यवसाय अधिकृतरित्या करता येईल. ही कंपनी भारतातील प्रक्रिया सुरू करणाऱ्या प्रमुख तीन कंपन्यांपैकी आहे.
लेनदेनक्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, “बिगरबँकिंग वित्तीय कंपनी-पी२पी म्हणून नोंदणी होणे ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक ना एक दिवस नक्की नियमन कंपनी होऊ, या आशेवर आम्ही सुरुवात केली त्या काळाच्या तुलनेत आताची वेळ म्हणजे एकदम वेगळे युग आहे. या प्रक्रियेमुळे लेनदेनक्लब एक ब्रँड म्हणून अधिक समर्थपणे सेवा देऊन कर्जदारांचा आत्मविश्वास वाढीला लावणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, लेनदेनक्लबची २०१५ साली भारतातील मुंबईत स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुलभ आणि सक्षम पी२पीच्या मान्यतेसाठी संशोधन आणि विकास प्रक्रिया सक्रियपणे राबवल्या. नियमनाचे पालन, ग्राहकांची सोय, व्यवहारातील पारदर्शकता आणिमुळे भविष्यात लवकरच अधिक शहरांमध्ये प्रवेश केला जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतभरात कंपनीची उपस्थिती असेल. पैशांच्या परतफेडीसाठी पाठिंबा याची खात्री देणारी प्रक्रिया प्रभावीपणे संरचित करण्यात आली, कंपनीला भारताच्या पी२पी कर्ज क्षेत्रात बाजारपेठेत अग्रेसर व्हायचे आहे, हे उद्देश लक्षात घेऊन व्यवसायाचे मॉडेल तयार करण्यात आले. कंपनी सध्या भारतातल्या पाच शहरांमध्ये कार्यरत आहे. बिगरबँकिंग वित्तीय कंपनी-पी२पीमुळे भविष्यात लवकरच अधिक शहरांमध्ये प्रवेश केला जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतभरात कंपनीची उपस्थिती असेल.