जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची जिल्हा बैठक बुधवार 27 रोजी दुपारी 2 वाजता पद्मालय विश्रामगृह येथे होत असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 3 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे पक्षाचा 60वा वर्धापनदिनाच्या तयारीकामी जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीत विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
बैठीकचे अध्यक्ष रमेश मकासरे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), मोहन निकम (प्रदेश सचिव), लक्ष्मण जाधव (खान्देश विभाग अध्यक्ष), रविंद्रनाथ तायडे (उत्तर महाराष्ट्र सचिव), आनंद बाविस्कर (जिल्हाध्यक्ष), रविंद्र खरात (जिल्हाध्यक्ष), आनंद खरात जळगाव लोकसभा क्षेत्र अध्यक्ष, भरत मोरे (जिल्हा सचिव), अण्णा खेडकर, भगवान सोनवणे, प्रविण बाविस्कर, एस.टी.साळवे, सुरेश भोसले, भोपलू इंगळे, दीपक सपकाळे, रमाताई ढिवरे, प्रतिभा भालेराव, मिलींद सोनवणे, वसंत केदार, माया सरदार, शाम संदानशिव, अरुण गजरे, अशोक पारधे, भिमराज रायसिंगे, रोहीदास अहिरे, प्रताप बोदडे, विक्रम हिरोळे, पप्पू सुरडकर, नंदाबाई बाविस्कर, समुनबाई इंगळे, प्रताप बनसोडे, अशोक पारधे, यशवंत घोडेस्वार, हरीष शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून जिल्हाभरातील रिपाइं (आठवले) गटाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.