रिपाइंतर्फे अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

0

जळगाव । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गट महिला आघाडीच्यावतीने पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस जळगाव तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण केले. महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. यावेळी महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा प्रतिभा भालेराव, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर संघटक खंडू महाले, सुरेखा बेडसे, सुलोचना माळी, सिमा भोई, लता वाघ, अनिता पाटील, पुजा कोळी, गोदाबाई राठोड, संगीता पवार, रवि भोई, बंटी मराठे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.