जळगाव। के.सी.ई.सो.चे ओजस्विनी कला विभाग मु.जे. महाविद्यालयतर्फे दि. 7 ते 11 जुलै पर्यंत रिमझिम कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, औरंगाबादचे रांगोळी, कलाकार महेंद्र खाजेकर, के.सी.ईचे सदस्य किरण बेंडाळे, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे अविनाश काटे यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींनी भारावले रसिक
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकृती जसे संकल्प चित्र, स्मरण चित्र, डिझाइन, स्केचींग निसर्ग चित्र, पेन्सिल रोडींग, ऑईल पेटींग, लोगो डिझाइन, कॅलीग्राफी, पोट्रेट, क्रिएटिव्ह पेंटीग, अॅब्स्टॅक पेंटीग, पोस्टर, क्रास्ट, 3 डी डिझाईन, जाहिरात कला फोटोग्राफी, 2 डी. डिझाईन आदिंची मांडणी केलेली आहे.या प्रदर्शनात औरंगाबादचे महेंद्र खाजेकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांचे रांगोळी माध्यमात अवघ्या एका तासात व्यक्ती चित्रणाचे प्रात्याक्षिक दाखविले. रविवारी सकाळी 11.00 वाजता सुप्रसिध्द चित्रकार गणेश तळसकर पुणे यांचे कॅन्व्हासवर तैलरंगात व्यक्तिचित्रणाचे मार्गदर्शन होणार आहे. सर्व कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.