रिया, शिवानी, सालसा, रिशिका मुख्य फेरीत

0

पुणे । आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी आयोजित 25000 डॉलर पुरस्कार रकमेच्या पुणे ओपन महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत सालसा आहेर, शिवानी इंगळे, यांसह सहा भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शिवानी इंगळे हिने आरती मुनियनवर 6-1, 6-3 असा विजय मिळवला. 16 वर्षीय पुण्याच्या सालसा आहेरने शिरत पन्नुचे आव्हान 6-0, 6-1 असे संपुष्टात आणले. निधी चिलुमुलाने हुमेरा शेखचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(2) असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. माजी राष्ट्रीय विजेत्या रिया भाटियाने साई सुदीप्ता येड्डूलाचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. रिशिका सुंकाराने परीन शिवेकरला 6-4, 6-2 असे नमविले. रम्या नटराजनने सोहा सादिओचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(4), 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

अंतिम पात्रता फेरी
रिया भाटिया(भारत) वि.वि.साई सुदीप्ता येड्डूला (भारत) 6-0, 6-1;शिवानी इंगळे(भारत) वि.वि.आरती मुनियन (भारत) 6-1, 6-3;निधी चिलुमुला(भारत) वि.वि.हुमेरा शेख(भारत) 6-3, 7-6(2); प्रेरणा भांब्री(भारत) वि.वि.सारा यादव(भारत) 6-3, 6-3; साई संहिता चमर्थी(भारत) वि.वि.अम्रिता मुखर्जी(भारत) 6-0, 6-4; रिशिका सुंकारा(भारत) वि.वि.परीन शिवेकर(भारत) 6-4, 6-2; रम्या नटराजन(भारत) वि.वि.सोहा सादिओ (भारत)3-6, 7-6(4), 6-3; सालसा आहेर(भारत) वि.वि.शिरत पन्नु (भारत)6-0, 6-1.