मुंबई – जिओच्या धन धना धन ऑफरमुळे इंटरनेटसेवा इतकी स्वस्त असू शकते याची खात्री रिलायन्सने दिली. या धक्क्यातून सावरत असतानाच मोबाईल कंपन्यांना आणि ग्राहकांना एक दुसरा धक्का मिळणार आहे. केवळ ५०० रुपयात फोरजी व्होल्ट मोबाईल हँडसेट सामान्य माणसाला देणार आहे.
जिओ हा फोर जी व्होल्ट फोन लाँच करण्यासाठी प्रदीर्घ काळ बोलणी करीत होता. आता लवकरच हा मोबाईल हँडसेट बाजारात येणार आहे. त्याची किंमत केवळ ५०० रूपये असणार आहे. रिलायन्स उद्योगाची सर्वसाधारण वार्षिक सभा २१ जुलैला आहे. बहुतेक त्यावेळी फोर जी व्होल्ट ची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्याचे टुजी फोन्सचे ग्राहक रिलायन्सला खेचायचे आहेत. म्हणून ६५० ते ९७५ रूपयांचा फरक सहन करून व्होल्ट बाजारात आणले जाणार आहेत, असे टेलिकॉम विश्लेषक राजीव शर्मा यांचे म्हणणे आहे. ट्रायच्या जुन महिन्यातील आकडेवारीनुसार फोरजी सेवा पुरविण्यात रिलायन्स (१८.८ मेगाबाईट पर सेकंद) व्होडाफोन (१२.२९), आयडिया (११.६८), एअरटेल (८.२३) च्या पुढे आहे.
व्होल्ट म्हणजे काय….
व्होल्ट म्हणजेच व्हॉइस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशनचे संक्षिप्त टेलिकॉम क्षेत्रातील शब्दरूप. मोबाईलधारकांसाठी महत्वाची माहिती अशी की व्होल्टची अर्थ आवाजाची चांगली गुणवत्ता, मोबाईल डेटा आणि कॉलिंग एकाच वेळी वापरणे, फास्ट नेटवर्क. रिलायन्सच्या फोरजी व्होल्ट मोबाईल हँडसेटमध्ये हे सर्व असेल.