श्रद्धा कपूरच्या हसीना परकार फिल्मसाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार. गँगस्टर दाऊद इब्राहिम याची बहिण हसीनाचा रोल श्रद्धा करणार आहे. ही फिल्म जीवनचरित्र किंवा बायोपिक या प्रकारात मोडते.
फिल्मच्या रिलिजमध्ये अनेक विघ्ने येत आहेत. 14 जुलैला जग्गा जासूसमुळे अडथळा आला आणि नंतर इंदू सरकारमुळे. 18 ऑगस्ट हा मुहुर्त ठरला आणि आता खबर आली की हाही मुहूर्त टळलाय. त्या वेळी शाहरूखचा जब हॅरी मेट सेजल आणि अक्षय कुमारचा टॅक्स फ्री टॉयलेट एक प्रेम कथा येत आहेत.
कोणत्या ना कोणत्या फिल्मच्या कारणाने हसीना परकार बाजारात येत नाही. निर्मात्यांनाही धोका घ्यायचा नाही. त्यांना फिल्मने निर्वेधपणे धंदा करावा असे वाटणे स्वाभाविकच आहे.