मुक्ताईनगर- तालुक्यातील रीगाव येथे येथील शेत-शिवारात वाघाने गायीचा फडशा पाडल्याची 16 डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.रीगाव शेती शिवारातील गट क्रमांक 62/1 या महादेव संपत पाटील यांच्या मालकीच्या शेतात त्यांच्याच पाच गाई झाडाला दोन ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका गायीवर रात्री दोन वाजेच्या सुमारास 16 डिसेंबरच्या रात्री वाघाने हल्ला करीत तिला ठार मारले. सकाळी महादेव पाटील यांचा मुलगा मंगेश पाटील हा शेतात पोचल्यानंतर त्याच्या लक्षात हा प्रकार आला. संबंधित घटनेबाबत वनविभागाला सूचना देण्यात आली असून सायंकाळपर्यंत गाईच्या मृत्यूचा पंचनामा झालेला नव्हता. तसेच या संदर्भात वन विभागातर्फे रात्री मृतकाचे शरीर तसेच ठेवून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या प्राणी केला, हे स्पष्ट होणार आहे.